WhatsApp बंद होणार? Meta ने दिली महत्त्वाची अपडेट; जारी केली यादी

WhatsApp मध्ये बदल होणार आहे. यामध्ये अॅपच्या सिस्टम रिक्वायरमेंटमध्ये थोडा बदल पाहायला मिळू शकतो. अशात काही मोबाईलवर हे अॅप काम करणार नाही.

या यादीत Samsung, Apple, Motorola, Sony सहित अनेक ब्रँड्सचा समावेश आहे.

आगामी काळात असे 35 प्रकारचे मॉडेल असतील ज्यावर WhatsApp सपोर्ट करणार नाही. कंपनीकडून या अॅपला सेक्यूरिटी पॅच अपडेट मिळणार नाही.

Meta ला आपल्या मेसेजिंग अॅपचा परफॉर्मन्स आणि सेक्युरिटी यांना उत्तम करायचं आहे. अशात काही युजर्सना आपल्या स्मार्टफोनला अपडेट कऱण्याची गरज भासेल.

Samsung

या यादीत Samsung च्या Galaxy Note 3, Galaxy S3 Mini आणि Galaxy S4 Mini चा समावेश आहे.

Motorola

Motorola च्या Moto G आणि Moto X चाही या यादीत समावेश आहे. याशिवाय Apple चा iPhone 6 आणि iPhone SE वरही सपोर्ट मिळणार नाही.

Sony

या यादीत सोनीच्या Xperia Z1, Xperia E3 चाही समावेश आहे. याशिवाय LG च्या Optimus 4X HD, Optimus G, Optimus G Pro आणि Optimus L7 हेदेखील आहेत.

यामध्ये Huawei चं मॉडेलही आहे. पण भारतीय मोबाईल इंडस्ट्रीत ही कंपनी आता नाही.

जर तुमचाही मोबाईलही या यादीत असेल तर तुम्हाला डिव्हाइस अपडेट करण्याची गरज आहे. सपोर्ट बंद झाल्यास सर्व फीचर काम करणार नाहीत आणि सुरक्षेचाही धोका असेल.

VIEW ALL

Read Next Story