तयारी करा! 'या' तारखेपासून सुरु होणार Activa Electric चं बुकिंग

Shivraj Yadav
Nov 29,2024

होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडियाने (HMSI) 27 नोव्हेंबरला भारतीय बाजारपेठेत आपली पहिली इलेक्ट्रिक स्कूटर Honda Activa E लाँच केली आहे.

कंपनीने अद्याप या इलेक्ट्रिक स्कूटरची किंमत जाहीर केलेली नाही. पण 1 जानेवारीपासून स्कुटरचं बुकिंग सुरु होणार आहे.

फेब्रुवारीपासून स्कूटरच्या डिलिव्हरीला सुरुवात होईल असं सांगण्यात येत आहे.

Activa Electric मार्केटमध्ये येण्याआधीच लोकांमध्ये तिची क्रेझ पाहायला मिळत आहे. यामुळे कंपनीदेखील मोठी तयारी करत आहे.

HMSI चे अध्यक्ष सुत्सुमु ओटानी यांनी, पहिल्या वर्षी दोन्ही स्कूटर्सच्या जवळपास 1 लाख युनिट्सच्या उत्पादनाची योजना आखली जात आहे, असं सांगितलं आहे.

Activa Electric ला कंपनीने स्वॅपेबल बॅटरीसह सादर केलं आहे. यासाठी कंपनी लवकरच बॅटरी स्वॅपिंग सर्व्हिसदेखील सुरु करणार आहे.

सुरुवातीला होंडा अॅक्टिव्हा इलेक्ट्रिक बंगळुरु, दिल्ली, मुंबईसारख्या शहरांमध्ये विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे.

Activa Electric मधे कंपनीने 1.5kWh क्षमतेच्या दोन स्वॅपेबल बॅटरी दिल्या आहेत.

या स्कूटरमध्ये तीन रायडिंग मोड्स दिले आहेत. ज्यामध्ये इकॉन, स्टँडर्ड आणि स्पोर्टचा सहभाग आहे. स्पोर्ट मोडमध्ये टॉप स्पीड ताशी 80 किमी असेल.

कंपनीचा दावा आहे की, ही स्कूटर 7.3 सेकंदात ताशी 0 ते 60 किमीचा वेग पकडते.

VIEW ALL

Read Next Story