काळ्या रंगाची कार खरेदी करण्यापूर्वी हे वाचा; लगेच निर्णय बदलाल
तुम्ही हा निर्णय घेण्याचा विचारात असाल तर आधी ही माहिती वाचा. म्हणजे कार घेतल्यानंतर तिच्याकडे पाहताना किमान तुम्हाला पश्चाताप वाटणार नाही.
कारच्या खरेदीसाठी गेलं असता शोरूममध्ये बहुविध रंगांचे मॉडेल आपण पाहतो. पण मनात भरते ती म्हणजे काळ्या रंगाचीच कार.
तुम्हालाही कार घ्यायचीये? काळा रंगच पसंत करताय? थोडं थांबा. काही गोष्टींची पूर्वकल्पना असलेली बरी.
तुम्हाला माहितीये का काळा रंग सूर्यप्रकाश अधिकाधिक प्रमाणात शोषून घेतो.
रंगानं शोषलेल्या उष्णतेमुळं कारच्या आतील भाग प्रमाणाहून जास्त गरम होतो आणि यामुळं AC चं कुलिंगही धीम्या गतीनं होतं.
काळ्या रंगाची कार घेतल्यास तिची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं. कारण, चुकून एखादी लहानशी वस्तूही कारला घासून गेल्यास त्याचा व्रण इथं दिसू लागतो.
काळ्या रंगाची कार सांभाळत असताना तिच्या पॉलिशिंग आणि वॅक्सिंगचा खर्चही वाढतच जातो.
अती धुळीच्या ठिकाणी नेल्यास, पावसाच्या वातावरणातून अचानकच प्रदेश बदलून उन्हाळी भागात आल्यास कारवर राहणारे डाग स्पष्टपणे दिसतात आणि कारचा लूक खराब करतात.
थोडक्यात काळ्या रंगाची कार पाहताना तिचा रुबाब न्यारा वाटत असला तरीही हा रंग तितकाच खर्चिक आहे ही बाब मात्र नाकारता येत नाही.