हेलिकॉप्टर केवळ अब्जाधीश व्यक्तींना विकत घेता येतं, असा एक सर्वसाधारण समज आहे.
मात्र सत्य परिस्थिती अशी आहे की काही हेलिकॉप्टर एवढे स्वस्त असतात की तुम्ही सुद्धा एखाद्या हेलिकॉप्टरचे मालक होऊ शकता.
जगातील सर्वात स्वस्त हेलिकॉप्टर हे मॉस्किटो हेलिकॉप्टर म्हणून ओळखलं जातं. याचं दुसरं नाव यूएम-1 हेलिकॉप्टर असं आहे.
हे हेलिकॉप्टर वजनाने फार हलकं असतं आणि त्याचबरोबर त्याची रचना अगदी साधी असते.
या हेलिकॉप्टरमध्ये एक किंवा दोन जण बसू शकतात एवढी जागा असते.
हे अगदी साधं हेलिकॉप्टर असून त्यामध्ये कमर्शिअल फिचर्स नसतात, मात्र कमी अंतरासाठी प्रवास करायचा असेल तर हा अगदी उत्तम पर्याय आहे.
आता या हेलिकॉप्टरची किंमत किती असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे हेलिकॉप्टर अनेक लक्झरी कार्सपेक्षाही स्वस्तात उपलब्ध आहे.
अगदी रुपयांमध्ये सांगायचं झालं तर जगातील सर्वात स्वस्त यूएम-1 हेलिकॉप्टर हे 16 ते 33 लाख रुपयांदरम्यान असते.
हे हेलिकॉप्टर एका छोट्या इंजिनवर चालतं त्यामुळे त्याची क्षमता आणि प्रवासाचा टप्पा हा तुलनेनं मर्यादित असतो, हे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे.