जगभरात सध्या इलेक्ट्रिक कार आणि बाईकच्या मागणीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
EV वाहनांमध्ये फक्त कारच नाही तर दुचाकी इलेक्ट्रिक वाहनांची देखील मागणी वाढली आहे.
त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या नवीन डिझाइनसह EV स्कूटर सादर करत आहेत.
ज्यामध्ये तुम्हाला स्कूटर चालवण्यासाठी लायसन्स किंवा नोंदणीची आवश्यकता नाही.
आम्ही ज्या स्कूटरबद्दल बोलत आहोत, तिचे नाव झेलिओ लिटिल ग्रेसी इलेक्ट्रिक स्कूटर आहे.
या स्कूटरचा वेग खूप जास्त नाही. त्यामुळे ही स्कूटर 10 ते 18 वयोगटातील मुलेही चालवू शकतात. स्कूटरची एक्स शोरुम किंमत 49,500 रुपये आहे.