केवळ 500 Subscribers असतील तर व्हाल मालमाल! YouTube ने बदलले नियम

युट्यूबने मॉनेटायझेशनसंदर्भातील नियमांमध्ये बदल केला असून याचा फायदा व्हिडीओ बनवणाऱ्यांना होणार आहे. कसा ते पाहूयात...

पैसे कमवण्याचा प्रयत्न

YouTube वरील व्हिडीओंमधून पैसे कमवण्याचा प्रयत्न अनेकजण करतात. यासाठी ते बरीच माहिती सर्च करतात आणि सतत खटपट करत असतात.

मॉनेटाइजेशन आवश्यक

खरं तर YouTube वरील व्हिडीओंमधून पैसे कमवण्यासाठी युट्यूबर्सला आपलं चॅनेल आधी मॉनेटाइज करावं लागतं. मात्र हे नेमकं करतात कसं हे अनेकांना ठाऊक नाही.

मॉनेटायझेनशची प्रतिक्रिया सुलभ

पणं मॉनेटायझेनशची प्रतिक्रिया आता YouTube ने अधिक सोपी आणि सहज शक्य होईल अशी केली आहे.

क्रिएटर्सला प्रोत्साहन देण्यासाठी

YouTube ने व्हिडीओ बनवण्याची इच्छा असलेल्या कंटेट क्रिएटर्सला प्रोत्साहन देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे.

गुगलला मिळतात पैसे

YouTube वरील जाहिराती आणि प्रीमियम सबस्क्रायबर्सच्या माध्यमातून कंपनीला म्हणजेच YouTube ची मातृक कंपनी असलेल्या गुगलला पैसे मिळतात.

काही हिस्सा युट्यूब क्रिएटर्सला

YouTube ने जाहिरातींसाठी युट्यूबर्ससाठी काही अटी ठेवल्या आहेत. जाहिरातींमधून मिळणाऱ्या पैशांपैकी काही हिस्सा कंपनी युट्यूब क्रिएटर्सला देतात.

अटी पूर्ण करण्याचं बंधन

YouTube चॅनेल मॉनेटाइज करण्यासाठी काही युट्यूबर्सला काही अटी पूर्ण करणं आवश्यक असतं. याच अटी आता युट्यूब अधिक सौम्य आणि सोप्या करत आहे.

सध्याच्या नियमांप्रमाणे सबस्क्रायबर्सची अट होती?

YouTube च्या आतापर्यंतच्या नियमांनुसार चॅनेल मॉनेटाइज करण्यासाठी 1000 सबस्क्रायबर्सची आवश्यकता असायची. मात्र ही अट आता सौम्य करण्यात आली आहे.

आधी व्ह्यूअरशिपच्या होत्या या अटी

तसेच सध्याच्या नियमांनुसार मॉनेटायजेशनसाठी YouTube चॅनेलवरील व्हिडीओंना एका वर्षाच्या कालावधीत 4 हजार तासांची व्ह्यूअरशिप किंवा मागील 3 महिन्यांमध्ये 1 लाख शॉर्ट्स व्ह्यूज आवश्यकत होते. या अटींमध्येही बदल करण्यात आला आहे.

चॅनेल सहज मॉनेटाइज करता येईल

'टेक क्रंच'ने दिलेल्या वृत्तानुसार YouTube पार्टनर प्रोग्रामअंतर्गत कंपनीने मॉनेटायझेनशच्या अटी शिथिल केल्या आहेत. त्यामुळे आता अनेकांना आपलं चॅनेल सहज मॉनेटाइज करता येईल म्हणजेच त्या माध्यमातून पैसा कमवता येईल.

500 सबस्क्रायबर्स आवश्यक

YouTube च्या नव्या नियमांनुसार कोणतंही चॅनेल मॉनेटाइज करण्यासाठी 500 सबस्क्रायबर्स असणं आवश्यक आहे.

90 दिवसांमध्ये किमान 3 व्हिडीओ

तसेच मॉनेटाइजेशनसाठी ज्या चॅनेलवरुन रिक्वेस्ट केली जाणार आहे त्या चॅनेलवर मागील 90 दिवसांमध्ये किमान 3 व्हिडीओ अपलोड झालेलं असणं आवश्यक आहे.

युट्यूब शॉर्टच्या अटीमध्येही बदल

तसेच मॉनेटायजेशनसाठी युट्यूब चॅनेलवरील सर्व व्हिडीओंना मागील वर्षभरामध्ये किमान 3 हजार तासांचे व्ह्यूज हवेत. मागील 3 महिन्यांमध्ये 30 लाख युट्यूब शॉर्ट व्ह्यूज असणं आवश्यक आहे.

रिक्वेस्ट स्वीकारल्यानंतर

जर एखाद्या व्यक्तीचं चॅनेल या वरील अटी पूर्ण करत असेल तर त्यांना मॉनेटायजेशनसाठी रिक्वेस्ट पाठवता येईल. ही रिक्वेस्ट स्वीकारण्यात आल्यानंतर या युट्यूबर्सला सर्व टूल्सचा अॅक्सेस दिला जाईल.

VIEW ALL

Read Next Story