वयाची 55 वर्षे ओलांडल्यानंतर स्त्रियांची पोषणासाठीची गरज बदलू लागते.
त्यांची हाडे कुमकमवत होऊ लागतात. हाडांना सुदृढ ठेवण्यासाठी आहारात दूध दही आणि पनीर यांसरख्या कॅल्शिअम असलेल्या पदार्थांचा सामावेश करा.
व्हिटॅमिन डी शरीरात कॅल्शिअम वाढवण्यासाठी उत्तम मानले जाते. त्यामुळे आहारात अंडे, मांस, डाळ आणि मासे यांचा सामावेश करा.
भाज्या आणि फळांमध्ये असलेले फायबर स्त्रियांच्या पचनसंस्थेला योग्यरीत्या काम करण्यास मदत करते.
ड्राय फ्रुट्सचा आहारात सामावेश केल्यास ते हेल्थी फॅट वाढवण्यास मदत करतात.
निरोगी आरोग्यासाठी दिवसभरात किमान 7 ते 8 ग्लास पाणी प्या.
मीठाचे सेवन कमी प्रमाणात करा. अधिक मीठामुळे हाय ब्लड प्रेशर आणि स्ट्रोकचा धोका वाढू शकतो.
आहारात साखरेचा सामावेश मर्यादित प्रमाणात असायला पाहिजे. अतिप्रमाणात साखरेच्या प्रमाणाने हृदय रोगाचा धोका वाढू शकतो.