एक दिवस 24 तासांचा असतो हे आपल्या सर्वांना माहिती आहे. पण येणाऱ्या काळात तो 25 तासांचा होऊ शकतो.
वैज्ञानिकांच्या मते एका दिवसात 25 तास असू शकतात. यामागचे कारण जाणून घेऊया.
12 जुलै 2023 ला नेचर जियो सायन्समध्ये एक स्टडी छापून आलाय. तापमान वाढल्याने हिमनग वितळून पृथ्वीच्या मध्यभागी जास्त पाणी जमा होतंय.
यामुळे पृथ्वीचा वेग कमी झालाय.
पृथ्वीचे दोन्ही मॅग्नेटिक पोल ढासळलेयत. यामुळे मागच्या 3 दशकांपासून पृथ्वीचा वेग कमी झालाय.
100 कोटी वर्षांपूर्वी पृथ्वीचा एक दिवस 19 तासांचा होता. यानंतर पृथ्वी हळुहळू स्लो होत गेली.
ज्यामुळे वेळ वाढून 24 तास इतका झाला. हा वेळ अतिशय सूक्ष्म स्तरावर बदलतो.
1960 ची 2020 शी तुलना केली तर पृथ्वी जास्त वेगाने फिरत होती. 2021 पासून वेग कमी होऊ लागला. जून 2022 मध्ये सर्वात छोटा दिवस नोंदवला गेला.
प्रत्येक शतकात दिवस 2.3 मिलिसेकंदाने वाढतोय. यासोबतच चीनमध्ये बनलेला डॅम पृथ्वीचा वेग कमी करतोय.
जगातील सर्वात मोठा डॅम चीनमध्ये असून त्याचे नाव थ्री गार्जेस डॅम असे आहे.
या डॅमने पृथ्वीच्या वेगावरच परिणाम केलाय.