जेरिका हे जगातील सर्वात जुनं शहर मानलं जातं, ज्याचा इतिहास 11,000 वर्षांपूर्वीचा आहे.
सीरियातील दमास्कसचा इतिहास अंदाज 8,000 वर्षांपूर्वीचा आहे.
सीरियातील आणखी एक प्राचीन शहर, अलेपोचा इतिहास देखील सुमारे 8,000 वर्षांचा आहे.
लेबनानमधील बायब्लोस हे जगातील प्राचीन शहरांच्या यादीमध्ये येतं, ज्याचा इतिहास 7,000 वर्षांपूर्वीचा आहे.
फय्युम हे इजिप्तमधील एक प्राचीन शहर आहे, ज्याचा इतिहासत सुमारे 6000 वर्षांचा आहे.
लक्सर हे इजिप्तमध्ये वसलेलं हे जगातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे आणि त्याचा इतिहास 4,000 वर्षांपेक्षा जास्त आहे.
अथेन्स हे युरोपातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे. जे 3,400 वर्षांपासून अस्तित्वात आहे.
लिस्बनचा इतिहास 3,000 वर्षांहून अधिक जुना आहे, ज्यामुळे ते पोर्तुगालच्या सर्वात जुन्या विकसित शहरांपैकी एक आहे.
काशी किंवा बनारस म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाराणसीला 3,000 वर्षांचा इतिहास आहे आणि ते हिंदू धर्माचे केंद्र आहे.