काळ्याकुट्ट अंधारातही 'या' प्राण्यांना अगदी स्पष्ट दिसते

Feb 27,2025


मनुष्य हा सर्वात बुद्धिमान प्राणी असल्याचे सांगितले जाते. मात्र, प्राण्यांमध्ये अशी काही वैशिष्ट्ये आहेत, जी अनेकदा माणसांनादेखील मागे टाकतात.


प्राण्यांची दृष्टी हे त्यातीलच एक वैशिष्ट्य. या जगात असे काही प्राणी आहेत, जे रात्री म्हणजेच अंधारातसुद्धा अगदी स्पष्टपणे पाहू शकतात. अशा प्राण्यांविषयी सविस्तर जाणून घेऊया.

मांजर

मांजरीच्या डोळ्यात एक असा थर असतो जो प्रकाशाला रिफ्लेक्ट करतो. यामुळेच मांजरांना अंधारात गोष्टी अगदी स्पष्ट दिसतात.

सरडा

सरड्याच्या डोळ्यात एक विशेष प्रकारची पेशी असते. ही पेशी प्रकाशाला शोषून घेते आणि त्याला रिफ्लेक्ट करते.

कुत्रा

कुत्र्यांच्या डोळ्यातील बुबुळांचा आकार हा तलनेने मोठा असतो. त्यामुळे अंधारात अधिक प्रकाश दिसल्याने ते स्पष्टपणे पाहू शकतात.

वटवाघूळ

वटवाघुळाची दृष्टी ही स्पष्ट दिसण्यासाठी दिवसापेक्षा रात्री म्हणजेच अंधारात अधिक सक्षम असते. त्यामुळे त्यांना अंधारात गोष्टी अधिक स्पष्ट दिसतात.

सिंह

सिंहाची दृष्टी मानुष्यापेक्षा सहा पट अधिक असते आणि यामुळेच ते अंधारात लांब अंतरापर्यंत देखील चांगल्या प्रकारे पाहू शकतात.

रॅटलस्नॅक

रॅटलस्नॅकच्या डोळ्यांमध्ये बऱ्याच रॉड पेशी असतात ज्या त्यांना अंधारात स्पष्टपणे पाहण्यासाठी मदतशीर असतात.

वाघ

वाघांच्या डोळ्यांच्या मागील बाजूस टेपेटम ल्यूसिड नावाचा एक थर असतो. यामुळे त्यांना अंधारात अगदी स्पष्टपणे पाहता येते.

पिग्मी टार्सियर

पिग्मी टार्सियर या प्राण्यांचे डोळे खूप मोठे असतात. त्यामुळे हे लहान प्राण्यांचे अंधारात स्पष्टपणे पाहण्यासाठी सक्षम असतात.

VIEW ALL

Read Next Story