मुलं जन्माला घालू नका, मॉडेलने सांगितली 118 कारणं

मुलं जन्माला घालणं आणि त्यांचं पालन-पोषण करणं ही एक पूर्णवेळ जबाबदारी असते. यासाठी पालकांना अनेक गोष्टींचा त्याग करावा लागतो.

पण तरीही आई-बाप होणं हा एक आशीर्वाद असतो. आई किंवा बाप होण्याच्या आनंदाची तुलना कशाशीच होऊ शकत नाही.

पण जबाबदाऱ्यांचं ओझं असल्याने अनेक जोडपी उशिरा मूल जन्माला घालतात, तर काहीजण ही जबाबदारी टाळतात.

पण ऑस्ट्रेलियाच्या एका मॉडेलने मूल जन्माला न घालण्याची 118 कारणं सांगत नवी चर्चा सुरु केली आहे.

अजब यादी

Ellie Gonsalves च्या यादीत फक्त जबाबदारी नाही तर इतक विचित्र गोष्टींचाही उल्लेख आहे. जसं की, तुमचा मुलगा बलात्कारी किंवा सीरियल किरल झाला तर?

एलीने आपल्या इंस्टाग्रावर ही यादी शेअर केली असून, तिच्यावर अनेकजण संतापले आहेत.

पण काहींनी मात्र तिचं समर्थन केलं असून, ट्रोल करणाऱ्यांवरही टीका केली.

VIEW ALL

Read Next Story