'या' भारतीय अब्जाधीशानं दुबईत खरेदी केलं ₹17,10,00,00,000 चं घर

Sayali Patil
May 16,2025

दुबईमध्ये घर

जगाच्या नकाशावर लोकप्रियतेचं शिखर गाठलेल्या या दुबईमध्ये घर घेण्याची किमया केली आहे एका भातीय उद्योजकानं.

गडगंज संपत्ती

आर्सेलर मित्तलचे चेअरमन आणि तब्बल 1.55 लाख कोटी रुपये इतकी गडगंज संपत्ती असणाऱ्या लक्ष्मी मित्तल यांचं नाव जगातील श्रीमंतांच्या यादीत घेतलं जातं.

ब्रिटन

ब्रिटनमध्ये वास्तव्यास असणाऱ्आ मित्तल यांनी दुबईमधील सर्वात महागड्या घरांपैकी एक घर खरेदी केलं आहे.

बेवर्ली हिल्स ऑफ दुबई

बेवर्ली हिल्स ऑफ दुबई नावाचं आलिशान घर त्यांनी नुकतंच खरेदी केलं असून हा दुबईतील सर्वात महागडा व्यवहार ठरला आहे

200 मिलियन डॉलर

2023 मध्ये या घराची किंमत 200 मिलियन डॉलर इतकी होती, तर, आजच्या घडीला ही किंमत 1710 कोटी रुपयांवर पोहोचली आहे.

चर्चा

ब्रिटनमधील अनेक श्रीमंत व्यक्ती या देशाबाहेरील पर्याय चाचपडत असतानाच मित्तल यांनी दुबईमध्ये हे घर खरेदी केल्यानं त्याची अधिकच चर्चा होत आहे. मित्तल यांच्याकडे लंडनमध्येही एक घर असून त्याची किंमत आहे 11.7 कोटी पाऊंड अर्थात 1384 कोटी रुपये.

VIEW ALL

Read Next Story