जगातील सर्वात धोकादायक पक्षी! माणसाचाही घेऊ शकतो जीव; वजन, उंची पाहून बसेल धक्का

Swapnil Ghangale
Mar 07,2025

काही पक्षी फारच धोकादायक

जगात हजारो प्रकारचे पक्षी आहेत. वेगवेगळ्या आकाराच्या या पक्षांपैकी काही पक्षी फारच धोकादायक असतात.

याच पक्षाची नावं घेतली जातात

सामान्यपणे धोकादायक पक्षी म्हटल्यावर डोळ्यासमोर घार, गरुड आणि घुबड अशा पक्षांची नावं येतात.

इतका धोकादायक की...

मात्र आज आपण ज्या पक्षाबद्दल जाणून घेणार आहोत तो इतका धोकादायक आहे की तो एखाद्या व्यक्तीचा जीवही घेऊ शकतो.

कुठे सापडतो हा पक्षी?

या पक्षाचं नाव कैसोवरी असं आहे. हा पक्षी ऑस्ट्रेलिया आणि पश्चिम आफ्रिकेतील गिना देशात आढळून येतो.

जीवही घेऊ शकतो

हा पक्षी एवढा धोकादायक आहे की एखाद्या व्यक्तीने या पक्षाला त्रास दिला किंवा त्याच्या वाटेला गेला तर तो त्याचा जीवही घेऊ शकतो.

...तर फारच हिंसक होतात

खरं तर हे पक्षी फळं खाऊन जगतात. मात्र कोणी त्यांची छेड काढली, त्यांना त्रास दिला तर ते फारच हिंसक होतात.

पंजा फारच घातक

या पक्षाच्या पायाच्या पंजाची आतील बाजू फारच खरबडीत आणि तितकीच तीक्ष्ण असते. त्याची पकडही फार मजबूत असते.

शक्ती किती?

कैसोवरीच्या पंजांची पकड आणि शक्ती एवढी असते की तो केवळ पंजाच्या मदतीने एखाद्या व्यक्तीचं पोटही फाडू शकतो.

वजन आणि उंची किती?

कैसोवरी हा दिसायलाही सामान्य पक्षांपेक्षा वेगळा आहे. सामान्यपणे या पक्षाची उंची 1.8 मीटरपर्यंत असते. तर वजनाबद्दल बोलायचं झाल्यास त्यांचं वजन 60 ते 80 किलो असतं.

...म्हणून त्याला उडता येत नाही

कैसोवरीचे पंख मोठे आणि मजबूत असतात. मात्र जास्त वजन आणि पंजांच्या विशेष रचनेमुळे त्याला उडता येत नाही.

VIEW ALL

Read Next Story