सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता ठाऊक आहे का? जाणून घेऊयात रंजक माहिती
भारताच्या चांद्रयान-3 मोहिमेची जगभरामध्ये चर्चा आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर मोहीम नेणारा भारत हा जगातील पहिलाच देश आहे.
मात्र आपल्या सूर्यमालेतील 9 ग्रहांना एकूण 297 चंद्र म्हणजेच नैसर्गिक उपग्रह आहेत.
सूर्यमालेतील 20 चंद्र म्हणजेच उपग्रह एवढे मोठे आहेत की त्यांना त्यांची स्वत:ची गुरुत्वाकर्षण कक्षा आहे.
पृथ्वीला एकच चंद्र असला तरी सूर्यमालेतील सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह कोणता ठाऊक आहे का? जाणून घेऊयात याचबद्दल...
बुध ग्रहाला एकही चंद्र नाही. बुध हा सूर्याच्या सर्वात जवळचा ग्रह आहे.
पृथ्वीचा शेजारी असलेला शुक्र ग्रहालाही एकही चंद्र नाही.
सूर्यापासून सर्वात जवळ असलेला आणि नैसर्गिक चंद्र असलेला पृथ्वी हा क्रमवारीनुसार पहिला ग्रह आहे.
मंगळ ग्रहाला 2 चंद्र आहेत. 2 चंद्र असलेला मंगळ हा सूर्यमालेतील एकमेव ग्रह आहे.
गुरु हा सूर्यमालेतील सर्वात मोठा ग्रह असला तरी तो सर्वाधिक चंद्र असलेला ग्रह नाही.
गुरुला एकूण 95 चंद्र आहेत. हे चंद्र फार लहान मोठ्या आकाराचे आहेत.
शनी ग्रह हा सर्वाधिक चंद्र असलेला सूर्यमालेतील ग्रह आहे. शनीला तब्बल 146 चंद्र आहेत.
म्हणजेच सूर्यमालेतील एकूण चंद्रांच्या संख्येपैकी अर्ध्याहून अधिक चंद्र शनीच्या अवतीभोवती फिरतात.
युरेनसला एकूण 27 चंद्र आहेत. चंद्रांच्या संख्येबाबतीत युरेनस हा तिसऱ्या स्थानी आहे.
नेपच्यूनला एकूण 14 चंद्र आहेत.
बटूग्रह म्हणून सूर्यमालेमधून बाहेर काढण्यात आलेल्या प्लुटोलाही लहान आकाराचे 5 चंद्र आहेत.