तिखट... जाळsss....

तिखट... जाळsss....; 'या' देशांमध्ये सर्वात झणझणीत पदार्थ खाण्याला पसंती

सर्वात तिखट खाद्यपदार्थ

विडोवर फॉल हा भारतात बनवला जाणारा सर्वात तिखट खाद्यपदार्थ असून तिखटपणाच्या परिणामात म्हणजे स्कोविल स्केलमध्ये तो 1 लाखांच्या टप्प्यात येतो.

सुसाईड बरिटो

काहींच्या मते कोरियातील सुसाईड बरिटो जगातील सर्वात तिखट खाद्यपदार्थ आहे.

थायलंड

थायलंडमध्येही सर्वात तिखट पदार्थ खाल्ले जातात. इथं बनवल्या जाणाऱ्या करीमध्ये विविध प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. शिवाय चवीसाठी वरूनही मिरचीचा वापर केला जातो. मध्येही सर्वात तिखट पदार्थ खाल्ले जातात. इथं बनवल्या जाणाऱ्या करीमध्ये विविध प्रकारच्या मसाल्यांचा वापर केला जातो. शिवाय चवीसाठी वरूनही मिरचीचा वापर केला जातो.

मेक्सिको

मेक्सिकोमध्ये हॅलपिनो, पाब्लोअन, हेबानेरो, एंचो आणि सेरानो अशा प्रकारच्या मिरच्यांचा वापर करतात.

मलेशिया

मलेशियातील ओटक ओटक हा पदार्थही जगातील सर्वाधिक तिखट पदार्थांमध्ये गणला जातो. मासळीमध्ये लाल मिरचीपूड मिसळून हा पदार्थ तयार केला जातो.

कोरिया

कोरियातील नागरिकांना भाताच्या पदार्थांसोबत मसालेदार ग्रेव्ही खाणं आवडतं. चिकन बुलडक किमची आणि मिरचीचा वापर करून फरमंट केलेला कोबी इथं आवडीनं खाल्ला जातो.

पाकिस्तान

पाकिस्तानातही तिखट खाद्यपदार्थांना पसंती मिळते. भारताशी इथली खाद्यसंस्कृती बऱ्याच अंशी मिळतीजुळती आहे.

चीन

चीनच्या बहुतांश भागांमध्ये मसालेदार खाद्यपदार्थांना पसंती मिळते. चीनची खरी चव घ्यायची झाल्यास एकदातरी सिचुआन पॉपकॉर्न नक्की खा.

इराण

मसालेदार, चटपटीत आणि झणझणीत पदार्थ खाणाऱ्या देशांमध्ये इराणही मागे नाही. इराणच्या दक्षिण भागात तिखट खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

VIEW ALL

Read Next Story