आश्चर्याची बाब म्हणजे या यादीत भारताचं स्थान 103 वं आहे. अहवालानुसार देशात प्रती व्यक्ती 5.54 लीटर मद्यविक्री होते.
Worldranking.com च्या माहितीनुसार यादीत मद्यपानाच अग्रेसर असणारा देश आहे सेशल्स. इथं वर्षाला एक व्यक्ती 20.5 लीटर मद्यप्राशन करतो.
तिसऱ्या स्थानी चेक रिपब्लिक आणि दुसऱ्या स्थानी युगांडानं यादीज स्थान मिळवलं असून, इथं अनुक्रमे 14.45 आणि 15.9 लीटर प्रतीव्यक्ती इतकी मद्यविक्री होते.
चौथ्या स्थानावर असणाऱ्या लिथुआनियामध्ये वर्षाला 13.22 लीटर इतकी मद्यविक्री प्रत्येक व्यक्तीमागे केली जाते.
यादीत सहाव्या स्थानी जर्मनी आणि पाचव्या स्थानी लक्झमबर्ग असून, इथं अनुक्रमे 12.91 आणि 12.94 लीटर प्रतीव्यक्ती इतकी मद्यविक्री वर्षाला होते.
आयर्लंड या यादीत सातव्या स्थानी असून, देशात दरवर्षी प्रत्येक व्यक्तीमागे 12.88 लीटर मद्यविक्री होते. 3
आठव्या स्थानावर लातवियाचं नाव असून, इथं एका वर्षात एक व्यक्ती 12.77 लीटर मद्यप्राशन करतं.
या यादीत दहाव्या स्थानावर बल्गेरियाची नोंद असून, इथं वर्षाला माणसी 12.65 टक्के मद्यविक्री होते. स्पेन या यादीच नवव्या स्थानावर असून, देशात सरासरी दरवर्षी एक व्यक्ती 12.72 लीटर मद्यसेवन करतो.