आकाश आणि अवकाश यांच्याविषयीची काही अशी रहस्य आहेत, जी तुम्हाला हैराण करून सोडतात. असंच एक रहस्य आहे दिनचक्राचं.
सहसा पृथ्वीवर एक दिवस 24 तासांचा असतो. पण, इतर ग्रहांच्या बाबतीत हे गणित बदलतं. एक ग्रह तर असाही आहे ज्याचा एक दिवस म्हणजे पृथ्वीवरचे 34 आठवडे.
धक्का बसला? या ग्रहाचं नाव आहे, शुक्र. पृथ्वीच्या तुलनेत हा ग्रह सूर्याच्या अधिक जवळ आहे. मात्र त्याचा परिभ्रमण वेग अतिशय कमी आहे.
शुक्रावरील एक दिवस म्हणजे पृथ्वीवरील साधारण 243 दिवस असं हे गणित आहे.
सूर्यमालेतील सर्वाधिक उष्ण ग्रहांपैकी एक म्हणजे शुक्र. याच्या पृष्ठाचं तापमान इतकं अधिक आहे की काचही क्षणाच वितळेल.
शुक्रावर पृथ्वीच्या तुलनेत 90 पट अधिक दबाव आहे, ज्याचा परिणाम त्याच्या गतीवर होताना दिसतो.
शुक्रावर दोन वार्षिक सूर्योदय पश्चिमेकडे होतात आणि दोन सूर्योदय पूर्वेकडे होतात.