हल्ली सोन्याचे दर इतके महागले आहेत, की सोनं नेमकं स्वस्त कुठं मिळतं? हाच प्रश्न अनेक मंडळी उपस्थित करताना दिसतात.
लक्षात घ्या, दुबईमध्ये सोन्याचे दर तुलनेनं कमी असून, सध्या तिथं 10 ग्रॅम सोन्यासाठी 67686 रुपये इतकी किंमत मोजावी लागते. असं म्हणतात की दुबईच्या सोन्याचा दर्जा उत्तम असतो.
दर्जासोबतच दुबईतील दागिन्यांवरील कलाकुसरसुद्धा लक्ष वेधते. याच दुबईतील Deira सिटी सेंटरला तेथील 'गोल्ड हब' म्हटलं जातं. इथं सोन्याची अनेक दुकानं असून, विविध सेलिब्रिटी मंडळीसुद्धा येथून सोनं खरेदी करतात.
दुबईमागोमाच थायलंडमधील चायना टाऊनमध्येही कमी दरात सोनं खरेदी करता येते. तर बँकॉकमध्येही हेच चित्र.
इंडोनेशियामध्ये 24 कॅरेट सोन्याची किंमत 1330266 IDR म्हणजेच 71880 रुपये प्रति 10 ग्रॅम इतकी आहे.
मागोमागच येणारं आणखी एक ठिकाण म्हणजे कम्बोडिया. जिथं 10 ग्रॅम सोन्यासाठी सद्यस्थितीला 71880 रुपयांत उपलब्ध आहे.
हाँगकाँग आणि स्वित्झर्लंड इथंसुद्धा सोन्याची खरेदी विक्री मोठ्या प्रमाणात होते. जिथं भारताच्या तुलनेत प्रतितोळा सोन्याचे दर बरेच कमी आहेत.