भारताचा कितवा क्रमांक....?

बापरे 'या' देशात होतात सर्वाधिक घटस्फोट; पाहा भारताचा कितवा क्रमांक....

सर्वाधिक घटस्फोट

जगात सर्वाधिक घटस्फोट होणाऱ्या देशांच्या यादीत पोर्तुगाल पहिल्या क्रमांकावर आहे. इथं 94 टक्के जोड्यांचे घटस्फोट होतात. त्यामागोमाग येतो स्पेन (84 टक्के).

तिसऱ्या क्रमांकावर येणारा देश...

घटस्फोटांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर येणारा देश आहे लक्जमबर्ग, इथं 79 टक्के घटस्फोट होतात. यानंतर रशिया (73 टक्के), युक्रेन (70 टक्के), क्यूबा (55 टक्के), फिनलँड (55 टक्के) आणि बेल्जियम (53 टक्के) या देशांचा समावेश होतो.

नवव्या स्थानावर स्वीडनचं नाव...

यादीत नवव्या स्थानावर स्वीडनचं नाव येतं. जिथं घटस्फोटाची सरासरी आकडेवारी 50 टक्के आहे. तर, फ्रान्स या यादीत दहाव्या स्थानी आहे.

सर्वात बलशाली राष्ट्र...

जगातील सर्वात बलशाली राष्ट्र अशी ओळख असणाऱ्या अमेरिकेमध्ये 45 टक्के घटस्फोट होतात. तर, चीनमध्ये 44 टक्के घटस्फोट होतात. युकेमध्ये हा आकडा 41 टक्के आहे.

शेवटच्या स्थानावर

भारताचं सांगावं तर, या यादीत भारत सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. इथं फक्त 1 टक्के नागरिकांचाच घटस्फोट होतो.

घटस्फोट होणाऱ्यांच आकडा..

भारताच्या आधी नाव येतं ते व्हिएतनामचं. इथं घटस्फोट होणाऱ्यांच आकडा 7 टक्के इतका आहे.

VIEW ALL

Read Next Story