Under Eye चुकूनही लावू नका 'या' गोष्टी, नाही तर होतील गंभीर समस्या

Diksha Patil
Jun 24,2023

डोळ्याच्या आजुबाजूला असणारी त्वचा सेन्सेटिव्ह

डोळ्याच्या आजुबाजूला असणारी त्वचा ही सेन्सेटिव्ह किंवा खूप संवेदनशील असते. त्यामुळे त्याची खूप काळजी घ्यावी लागते.

अंडर आय त्वचा सेन्सेटिव्ह असल्यानं काय होतं?

अंडर आय त्वचा सेन्सेटिव्ह असल्यानं त्याला मॉइश्चराइज ठेवणं आणि साफ ठेवणं खूप कठीण असते.

डोळ्याच्या सततच्या हालचालीमुळे होतात 'या' गोष्टी

डोळ्याची सतत हालचाल केल्यानं रिंकल्स किंवा फाइन लाइन्स येतात.

अंडर आयची काळजी कशी घ्यायची?

अंडर आयची काळजी घ्यायची असेल तर त्यासाठी त्याची माहिती असणं म्हत्त्वाचे आहे. कारण काही गोष्टी अंडर आयसाठी वापरल्यास त्याचा विपरीत परिणाम होऊ शकतो.

हाइड्रोजन पॅरॉक्साइड

हायड्रोजन पॅरॉक्साइड हे एक ऑक्सिडाइजिंग एजंट आहे जे केसांना शाइन येण्यासाठी वापरतात. तर त्वचेवर लावल्यास रेडनेस किंवा रॅश येऊ शकतात.

काय होऊ शकते हायड्रोजन पॅरॉक्साइड वापरल्यास समस्या?

डोळ्यांच्या खाली म्हणजेच अंडर आयला हायड्रोजन पॅरॉक्साइड लावल्यास जळजळ होऊ शकते.

रेटिनॉइड्स

रेटिनॉइड्सनं डार्क सर्कल्स जातात असे अनेकांना वाटतं पण त्याचा वापर हा पिंपल्स घालवण्यालाठी केला जातो.

सॅलिसिलिक अॅसिड

सॅलिसिलिक एसिड हे बाजारात मिळणाऱ्या अनेक प्रोडक्ट्समध्ये असते. अनेकांना वाटतं की अंडर आय म्हणजेच डार्क सर्कल्स घालवण्यासाठी सॅलिसिलिक अॅसिड लावल्यास फायदा होईल पण ते चुकीचं आहे.

सॅलिसिलिक अॅसिडनं काय होतं?

सॅलिसिलिक अॅसिडनं पिंपल्सची समस्या दूर होते. त्यानं त्वचा एक्सफोलिएट करण्यास आणि त्याचसोबत पोर्स बंद करण्यास मदत होते. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.) (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story