आजही 2016 सालात जगतोय 'हा' देश; कारणं वाचून व्हाल थक्क
या देशाचं नाव आहे इथिओपिया. अदीस अबाबा असं या देशाच्या राजधानीचं नाव.
आफ्रिका खंडातील दुसरा सर्वाधिक लोकसंख्या असणारा देश म्हणूनही इथिओपियाकडे पाहिलं जातं.
तुम्हाला माहितीये का, जगातील बहुतांश देश वर्षभरात 12 महिन्यांची दिनदर्शिका वापरात आणतात. पण, इथं मात्र एका वर्षात 13 महिने असतात.
1582 पासून या विचित्र आणि जगावेगळ्या ग्रेगोरियन कलेंडरची सुरुवात इथिओपियामध्येच झाली होती.
तत्पूर्वी इथं ज्युलियन दिनदर्शिका अमलात आणली जात होती. इथिओपियन महिन्याच्या शेवटच्या महिन्याला Pagume असं म्हटलं जातं. ज्यामध्ये 5 ते 6 दिवस असतात.
इथिओपियामध्ये नववर्ष 1 जानेवारीपासून नव्हे, तर 11 सप्टेंबरपासून साजरा केलं जातं.
आश्चर्याची बाब म्हणजे हा जगातील एकमेव असा देश आहे जो कधीच गुलामीत राहिला नाही.