12 लाख 58 हजार रुपये प्रती लिटर दराने का विकलं जातं या प्राण्याचं रक्त? कारण फारच खास

Swapnil Ghangale
Jun 14,2025

कोट्यवधी जीव-जंतू

मानवाप्रमाणे पृथ्वीवर कोट्यवधी जीव-जंतू वास्तव्य करतात. मानवी जीवनामध्ये या जीव-जंतूंनाही अनन्यसाधारण महत्त्व आहे.

जगातील सर्वात महागडं रक्त

मात्र पृथ्वीवरील एका प्राण्याचं रक्त हे जगातील सर्वात महागडं रक्त म्हणून ओळखलं जातं, हे तुम्हाला ठाऊक आहे का?

घोड्याच्या नाळीच्या आकारासारखा खेकडा

या प्राण्याचं नाव आहे हॉर्सशू क्रॅब म्हणजेच घोड्याच्या नाळीच्या आकारासारखा आकार असलेला खेकडा.

45 कोटी वर्षांपासून

आता हा तुम्हाला नवा जीव वाटला असेल तर तसं नाहीये! हॉर्सशू क्रॅब हा खेकड्याचा प्रकार पृथ्वीवर मागील 45 कोटी वर्षांपासून वास्तव्यास आहे.

डायनोसॉरच्या आधीपासून पृथ्वीवर

वैज्ञानिकांच्या दाव्याप्रमाणे हॉर्सशू क्रॅब हे पृथ्वीवर डायनोसॉरच्या आधीच्या काळापासून अस्तित्वात आहेत.

विज्ञानासाठी वरदान

या खेडकड्याचं रक्त संशोधन आणि विज्ञानासाठी वरदान असल्यासारखं मानलं जातं.

निळ्या रंगाचं रक्त

हॉर्सशू क्रॅबचं रक्त लाल नाही तर निळ्या रंगाचं असतं. त्यामुळे त्याला अधिक महत्त्वा प्राप्त होतं.

असते ही खास क्षमता

बॅक्टेरियाच्या संसर्गासंदर्भात सर्वात सूक्ष्म स्तरावर जाऊन शोध घेण्याची क्षमता हॉर्सशू क्रॅबच्या रक्तामधील घटकांत असते.

हे रक्त अत्यंत महाग विकलं जातं

याच कारणामुळे हॉर्सशू क्रॅबच्या रक्ताला जगभरातील औषध संशोधन क्षेत्रात कमालीचं महत्त्व असून त्यामुळेच हे रक्त अत्यंत महाग विकलं जातं.

रक्ताची किंमत साडेबारा लांखांहून अधिक

वेगवेगळ्या वृत्तांमधील संदर्भानुसार, हॉर्सशू क्रॅबच्या एक लीटर रक्ताची किंमत 15 हजार डॉलर इतकी आहे. भारतीय चलनानुसार ही रक्कम 12 लाख 58 हजार रुपये इतकी होते.

रक्तात आढळतो खास पदार्थ

हॉर्सशू क्रॅबच्या रक्तात हेमोसायनिन नावाचा तांबेयुक्त घटक आढळतो.

...म्हणून म्हणतात 'ब्लू गोल्ड'

या हेमोसायनिनमुळेच हॉर्सशू क्रॅबच्या रक्ताला निळा रंग येतो. म्हणूनच या रक्ताला ब्लू गोल्ड म्हणजेच निळं सोनं असंही म्हणतात.

VIEW ALL

Read Next Story