'चंगेज खान' हा निर्विवादपणे जगाच्या इतिहासातील सर्वात प्रभावी व्यक्तींपैकी एक आहे. बैकल सरोवराजवळ एका छोट्या भटक्या जमातीत जन्मलेला 'टेमुजिन', जे त्याचे मूळ नाव होते, तो मंगोलियाला एकत्र करणाऱ्या आणि चीनच्या पूर्वेकडील किनार्यापासून एड्रियाटिक समुद्रापर्यंत पसरलेल्या साम्राज्यावर राज्य करणारा माणूस बनला.
आणि हे सर्व असूनही, तो आता एका वेगळ्याच कारणासाठी प्रसिद्ध आहे.
BBC च्या रीपोर्ट्स द्वारे, काही वर्षांपूर्वी एका जेनेटिक रिसर्चद्वारे एक चकित करणारी गोष्ट समोर आली.
जगातील जवळजवळ ८ टक्के पुरुषांच्या Y क्रोमोजोम मध्ये एक निशाण होते,जे म्हंटले जाते की कदाचित चंगेज खानकडून आले आहे.
रिसर्च अनुसार, जगातील जवळजवळ 1 कोटी ६० लाख पुरुषांचा चंगेज खानशी संबंध आहे.
पाकिस्तानात एक असेच खास निशाण 'हजारा' समुदायाच्या लोकांमधील DNA मध्ये सापडले.
मुगल, चुगताई, मिर्झा आडनावाचे लोक स्वतःला मंगोल जातीचे म्हणवतात.
म्हंटले जाते की चंगेज खानने भरपूर लग्ने केली होती आणि त्याच्या मुलांची संख्या 200 पेक्षा जास्त होती.