सहसा एखादी गोष्ट खरेदी करायची झाल्यास ती डझनभरात घेताना कायम 12 आकड्यांचीच मोजणी होते.
केळी किंवा अंडी खरेदी करतानासुद्धा ती डझनभरात घ्यायची झाल्यास 12 च्या पटानंच मोजणी केली जाते. पण असं का? माहितीये?
असं यासाठी की, पूर्वीच्या काळात वस्तूंची संख्या मोजताना लोक हाताच्या बोटांचा वापर करत.
एका हाताच्या 4 बोटांचे 12 जोड असतात. याच कारणानं 12 चा आकडा ग्राह्य धरला जात होता.
1 डझन म्हणजे 12 नग, या मोजणीला Duodecimal System म्हटलं जातं.
1 डझनमध्ये 12 आकड्यांचीच मोजणी करण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे, 12 ची समप्रमाणात केली जाणारी विभागणीसुद्धा अधिक सोपी. थोडक्यात 2, 3 आणि 4 किंवा 6.
10 आणि 15 च्या बाबतीत हे विभागणीचं गणितही फार सोपं नसल्या कारणानं 1 डझन म्हणजे 12 हेच गणित कायमस्वरुपी चालत आलं.