विमानानं प्रवास करत असताना अनेकदा काही नियमांचं पालन करावच लागतं. विमानातील प्रवेशासंदर्भातील नियमही त्याचाच एक भाग.
विमानात प्रवेश करताना कायमच डाव्या बाजूच्या दारानं प्रवेश केला जातो. यामागे एक खास कारण असून हे कारण वाचून अनेकजण थक्कच होतात.
विमानाच्या दरवाजाची संकल्पना ही जहाजांपासून प्रेरित आहे.
गतकाळात जेव्हा समुद्रमार्गाने प्रवास केला जात होता तेव्हा जहाजावर चढण्यासाठी कायमच डाव्या बाजून असणारे प्रवेशद्वार वापरले जात होते.
जहाजं कायमच डाव्या बाजूनं बंदरावर आणली जातात. उजव्या बाजूला मात्र खोल समुद्र असतो.
नौकेच्या उजव्या बाजूला इंजिन असतं कारण बहुतांश लोक उजव्या हाताचाच सर्वाधिक वापर करतात. हेच समीकरण विमानांमध्येही वापरण्यात आलं.
विमानाच्या फक्त डाव्याच नव्हे, तर उजव्या बाजूलासुद्धा दरवाजा असतो. त्याचा वापर आपात्कालिन परिस्थिती, सामान लोड अनलोड, इंधन भरणं अशा कामांसाठी केला जातो.