आकाशात तरंगणारे ढग सर्वांनीच पाहिले असतील, त्यांना न्याहाळलंही असेल.
प्रथमदर्शनी हे ढग पाहताना कोणीतरी कापूस पिंजून ठेवलाय असाच भास अनेकांना होतो.
याच कापसासमान वाटणाऱ्या ढगांचं वजन किती असतं याचा विचार कधी केलाय का?
एका सर्वसाधारण ढगाचं वजन 1.1 मिलियम पाऊंड इतकं असतं. थोडक्यात एका ढगाचं वजन 100 हत्तींइतकं असतं.
ढगांचं वजन त्यामध्ये सामावलेल्या पाण्यामुळं इतकं जास्त असतं. हे वजन ढगांचा आकार आणि त्यांच्या घनतेनुसार बदलतं.
इतकं वजन असतानाही हे ढग आकाशात अगदी सहजपणे तरंगतात. यास कारण ठरतं ती म्हणजे उष्ण हवा.
वातावरणातील उष्ण हवा ढगांना कोसळण्यापासून रोखून धरते. आहे की नाही थक्क करणारी माहिती?