केसांच्या स्वच्छतेसाठी हल्ली जवळपास सर्वचजण आपआपल्या आवडीचा आणि केसांना साजेसा शॅम्पू वापरतात.
हाच शॅम्पू जन्माला कुठून आला, त्याचा शोध कोणी लावला याची कल्पना आहे का तुम्हाला?
अमेरिका किंवा चीन नव्हे, तर भारतात शॅम्पूचा शोध लावण्यात आला होता...... हैराण झालात ना?
सिंधुच्या खोऱ्यातील संस्कृतीमध्ये केसांच्या स्वच्छतेसाठी शॅम्पूचा वापर केला जात असे. ज्यामुळं केस मजबूत आणि स्वच्छ होत.
इंग्रज भारतात आले तेव्हा ते हा प्रकार पाहून भारावले. पुढे 1927 मध्ये बर्लिन इथं जर्मन संशोधक श्वार्जकोफनं द्रव स्वरुपातील शॅम्पू तयार केला.
आहे की नाही गमतीशीर बाब? थोडक्यात हा शॅम्पू किती जुना आहे हेसुद्धा तुमच्या लक्षात आलं असेलच....