वाळवंटात रात्रीच्या वेळी हाडं गोठवणारी थंडी का पडते?

Sayali Patil
May 29,2025

वाळवंट

वाळवंटामध्ये रात्रीच्या वेळी वाळूचं तापमान घटतं आणि यामुळं तिथं उष्मा कमी जाणवतो.

उष्णता

लक्षात घ्या, वाळू लगेच उष्णता शोषून घेते. मात्र ही उष्णता वाळूला रोखून धरता येत नाही.

पाण्याचा अंश

वाळवंटातील हवेत पाण्याचा अंश बराच कमी असतो. ज्यामुळं इथं वाहणारी हवा कोरडी असतो.

उष्मा

परिणामी जव्हा सूर्य तळपतो तेव्हा वाळू उष्णता शोषून घेते आणि पुन्हा ही उष्णता हवेतत सोडते ज्यामुळं वाळवंटात दिवसा प्रचंड उष्मा जाणवतो.

सूर्यास्त

रात्रीच्या वेळी जेव्हा सूर्यास्त होतो तेव्हा मात्र सारी उष्णता नाहीशी होते आणि वाळवंटात तापमानात घट होते.

कोरडी हवा

रात्रीच्या वेळी वाळूचे कण उष्णता अतिशय वेगानं बाहेर उत्सर्जित करतात, शिवाय कोरडी हवासुद्धा येथील तापमानात घट करण्यास कारणीभूत ठरते.

आर्द्रता

हवेतील आर्द्रता उष्णता स्थिर ठेवण्यास किंवा रोखून धरण्याचं काम करते. मात्र वाळवंटात आर्द्रतेचच प्रमाण कमी असल्यानं तिथं प्रचंड गारठा जाणवतो.

VIEW ALL

Read Next Story