भारतात सोनं खरेदीला धार्मिक महत्त्वही आहे. हिंदूमध्ये सोन्याला लक्ष्मीचं स्वरुप मानलं जातं.
मात्र मागील काही काळापासून सातत्याने सोन्याच्या दरांमध्ये वाढ होताना दिसत असून सोन्याच्या दराने नुकताच लाखाचा टप्पा ओलांडला होता.
सोन्याच्या दरांमध्ये 3 टक्के जीएसटी आणि घडणावळीचा खर्च जोडल्यास एक तोळा सोनं आजच्या घडीला एका लाखाहून अधिक महाग झालं आहे.
केवळ भारतातच नाही तर पाकिस्तानमध्येही काहीशी अशीच परिस्थिती असून पाकिस्तानी लोकही मागील काही काळापासून सोन्याच्या वाढते दर पाहून थक्क झालेत.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानमध्ये 24 कॅरेटच्या एक तोळा सोन्याची किंमत 3 लाख 79 हजार 150 पाकिस्तानी रुपये इतकी आहे.
म्हणजेच पाकिस्तानमध्ये 10 ग्राम सोन्याची किंमत 3 लाख 25 हजार 65 पाकिस्तानी रुपये इतकी आहे.
अंतरराष्ट्रीय स्तरावर अमेरिकेने घेतलेल्या आठमुठ्या भूमिकेमुळे करासंदर्भातील संघर्ष सुरु झाल्याने सोन्याचे दर वाढल्याचं सांगितलं जात आहे.