पॅरिस ट्रिपचा सर्वात खर्चिक काळ जून ते ऑगस्टदरम्यान असतो. त्यामुळं कमी खर्चासाठी ही ट्रिप एप्रिल-मे किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर या कालावधीत प्लॅन करा.
पॅरिस ट्रिपसाठीची उड्डाणं वर्षभर उपलब्ध असतात. पण, तुलनेनं ऑफ सीझन मध्ये तिकीटं स्वस्त असतात.
पॅरिसमध्ये हॉटेल्स महाग असल्यामुळं तुम्ही हॉस्टेल्स, काउचसर्फिंग निवडू शकता.
महागड्या रेस्तराँमध्ये न जाता इथं तुम्ही स्वस्त फूड पॉंईंट्स, स्ट्रीट फूड किंवा स्वत: पदार्थ बनवून नेलेले पदार्थ खाऊन पैसे वाचवू शकता.
पॅरिसमध्ये फिरण्यासाठी बस, मेट्रो, सायकल किंवा पायी प्रवासाचा पर्याय तुमचे भरपूर पैसे वाचवेल.
पॅरिसमध्ये म्युझिअम, पार्कमध्ये फिरणे, पब्लिक इव्हेंटमध्ये भाग घेणे कमी खर्चिक आहे. कमी खर्चात पॅरिस ट्रिपसाठी प्रत्येक व्यक्तीने दर दिवशी 5 ते 10 हजार रुपयांचं बजेट ठेवावं.
पॅरिसमध्ये अयफेल टॉवर, लॉअर म्युझिअम, नॉट्रे डॅम, आर्क डी ट्रायम्फ ही ठिकाणं नक्की पहावीत. (छाया सौजन्य- सोशल मीडिया)