अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संपूर्ण जगावर टॅरिफ लावण्याची घोषणा केलीय. डोनाल्ड ट्रम्प यांनी ही घोषणा एअर फोर्स वनमध्ये पत्रकारां सोबत चर्चा करताना केली.
येत्या काळात सर्व देशांवर टॅरिफ लावणार असल्याची घोषणा ट्रम्प यांनी केलीय.. त्यांनी भारतालाही जोरदार धक्का दिलाय. भारतावर 26 टक्के टॅरिफ आकारण्याची घोषणा केलीय.
टॅरिफ किंवा आयात शुल्कासंदर्भातील निर्णयानं ट्रम्प यांचा भारतालाही जोरदार धक्का आहे. या निर्णयानंतर नेमकं काय होईल, तर भारतीय ऑटो कंपन्यांसाठी मोठा अडथळा होऊ शकतो.
भारतीय वस्त्रप्रकार अमेरिकन बाजारपेठेत महाग होतील, प्रतिस्पर्धी देशांना फायदा होऊ शकतो.
इंजिनिअरिंग आणि केमिकल्स उत्पादनांवर परिणाम होण्याची शक्यता.
ज्वेलरी, इलेक्ट्रॉनिक्स, वायर आणि केबल कंपन्यांवर परिणाम होऊ शकतो.
नव्या टॅरिफमुळे औषध कंपन्यांच्या किमतीत वाढ होणार असून, अमेरिका, युरोपच्या फार्मा कंपन्यांना फायदा होण्याची शक्यता आहे.