जागतिक महिला दिन का साजरा केला जातो? काय आहे या दिवसाचे महत्त्व?

Mar 06,2025

जागतिक महिला दिन

दरवर्षी 8 मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. हा दिवस महिलांच्या सन्मानार्थ आणि त्यांच्या सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक तसेच राजकीय कर्तृत्वाचा गौरव करण्यासाठी साजरा केला जातो.

पहिल्यांदा कधी झाला साजरा?

महिला दिवस हा पहिल्यांदा 1909 मध्ये अमेरिकेतील सोशलिस्ट पार्टीद्वारे साजरा केला गेला होता. मात्र 1975 मध्ये याला संयुक्त राष्ट्राने आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता दिली.

ऐतिहासिक महत्त्व

20 व्या शतकात युरोप आणि अमेरिकेतील श्रमिक आंदोलनामुळे महिला दिनाच्या कल्पनेला वाव मिळाला. या आंदोलनात महिलांनी कार्यालयातील कामाच्या तासांची मर्यादा तसेच त्यांच्या अधिकारांची मागणी केली होती.

8 मार्च हा दिवस का?

1971 मध्ये रशियामध्ये महिलांनी ऐतिहासिक संप केला होता आणि या संपामुळेच त्यांना मतदानाचा अधिकार प्राप्त झाला. ग्रेगेरियन कॅलेंडरनुसार, 8 मार्च हाच तो दिवस.

महिला दिनाचे महत्त्व

आंतरराष्ट्रीय महिला दिन हा महिलांचे अधिकार, सामाजिक समानता, आर्थिक स्वातंत्र्य आणि लिंगभेदाच्या विरोधात जागरुकता पसरवण्याच्या उद्देशाने साजरा केला जातो.

2025 ची थीम

"Accelerate Action" ही यावर्षीच्या महिला दिनाची थीम आहे. महिलांना समान न्याय देणे आणि कोणताही भेदभाव न करता त्यांना समान संधी प्राप्त करुन देण्याचा या थीमचा उद्देश आहे.

कसा करावा साजरा?

या दिवशी प्रत्येकाने महिलांच्या अधिकाराविषयी तसेच त्यांच्या कर्तृत्वाविषयी जागरुकता पसरवण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. तसेच, गरजवंत महिलांना मदत करुन त्यांच्या प्रति असलेली आदराची भावना आपण जपली पाहिजे.

VIEW ALL

Read Next Story