भारतीय वंशाच्या करुण विजने इंजिनीअरिंगचे शिक्षण घेत असताना पैसे कमावण्यासाठी असा फॉर्म्युला शोधून काढला की आज तो काहीही न करता दर महिन्याला 9 लाख रुपयांहून अधिक कमावत आहे.
कॅनडातील करुण विज या भारतीय वंशाच्या व्यक्तीने अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना पैसे कमवण्याचे एक सूत्र शोधून काढले जे आज त्याच्यासाठी फायदेशीर ठरत आहे.
33 वर्षांच्या करुणला नेहमीच अनेक जागांचे मालक व्हायचं होतं. मालमत्तेच्या व्यवसायात जितका नफा मिळतो तितका इतर कोणत्याही व्यवसायात मिळत नाही, हे त्यांच्या कॉलेमध्येच लक्षात आले.
कॅनडामध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना, संपूर्ण घराऐवजी संस्थांच्या आसपासच्या मालमत्तेचे भाडे प्रत्येक खोलीसाठी आकारले जाते हे करुण विजला समजलं होतं.
त्यामुळे संपूर्ण मालमत्ता एका भाडेकरूला भाड्याने देण्याऐवजी स्वतंत्र खोल्या विद्यार्थ्यांना भाड्याने देणे फायदेशीर आहे हे करुण विजच्या लक्षात आलं.
CNBC मेक इटच्या अहवालानुसार, करुणच्या कॅनडामध्ये प्रत्येकी 28 खोल्या असलेल्या चार मालमत्ता आहेत, ज्या तो भाड्याने देतो. यातून तो दरमहा नऊ लाख रुपयांहून अधिक कमाई करत आहे.
मात्र करुण विजने या मालमत्ता खरेदी करण्यासाठी 2.3 दशलक्ष डॉलर्स म्हणजेच अंदाजे 19 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. त्यातून करुणला आता इतकी कमाई मिळत आहे.
करुण फक्त भाड्यातून येणाऱ्या पैशांवर अवलंबून नाही. पदवीनंतर त्यांनी अॅप्लिकेशन इंजिनीअर म्हणून काम केले. सध्या तो एका अमेरिकन कंपनीत सेल्स मॅनेजर आहे.