अंबानींचा 650 कोटींचा बंगला पाहिलात का? दुबईमधल्या घरातले Inside Photos

user Swapnil Ghangale
user Nov 21,2023

आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक

रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी हे केवळ भारतातील नाही तर आशियामधील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहेत.

वेगवेगळ्या देशांमध्ये संपत्ती

मुकेश अंबानी हे त्यांच्या आलीशान लाइफस्टाइलसाठी ओळखले जातात. जगभरातील वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांची संपत्ती आहे.

समुद्रकिनाऱ्यावरील बंगला

दुबईमधील पाम जुमैरा येथे अंबानींनी 163 मिलियन डॉलर्समध्ये हा समुद्रकिनाऱ्यावरील बंगला विकत घेतल्याचं वृत्त आहे.

10 BHK चं घर

समुद्रकिनारी असलेल्या हा बंगला म्हणजे 10 BHK चं घर आहे. यामध्ये 2 मोठे स्विमिंग पूल आणि स्पा सुद्धा आहे.

इटालियन मार्बलचा वापर करुन बांधकाम

अंबानींच्या या 650 कोटी रुपये किंमत असलेल्या घरातील बरेचसे काम हे इटालियन मार्बलचा वापर करुन करण्यात आल्याचं सांगितलं जातं.

एकूण एरिया किती?

अंबानींच्या दुबईमधील या 10 BHK घराचा एकूण एरिया 26,033 स्वेअर फूट इतका असल्याचं सांगण्यात येत आहे.

मुंबईतील घरही खास

मुकेश अंबानींचं मुंबईमधील अँटेलिया हे घरही आशियामधील सर्वात महागड्या घरांपैकी एक आहे.

VIEW ALL

Read Next Story