जगात एक अशी नदी आहे जी दहा देशांमधून वाहते असं सांगितल्यास तुम्हाला नक्कीच आश्चर्याचा धक्का बसेल, पण हे खरं आहे.
विशेष म्हणजे 10 देशांमधून वाहत असूनही ही युरोपमधील दुसरी सर्वाधिक लांबीची नदी आहे. ही नदी कोणती आणि ती कुठून कुठून वाहते ते पाहूयात...
ज्या नदीबद्दल आपण बोलतोय तिचं नाव आहे डेन्यूब नदी! ही जगातील सर्वाधिक देशांमधून वाहणारी नदी आहे.
जर्मनी, ऑस्ट्रिया, सर्बिया, बुल्गेरिया, रोमानिया, मोल्दोवा, स्लोवाकिया, हंगेरी, क्रोएशिया आणि युक्रेन या देशांमधून वाहते.
डेन्यूब ही नदी 2800 किलोमीटरचं अंतर कापून काळ्या समुद्राला मिळते.
वसंत ऋतूमध्ये या नदीला पूर सदृश्य स्थिती असते. या नदीच्या पाणीपातळीत या काळात वाढ होते.
वसंतामध्ये नदी रौद्ररुप धारण करण्याचं कारण म्हणजे आल्प्स पर्वतरांगांमधून बर्फ वितळून त्याचं पाणी नदीला मिळतं.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)