2011 मध्ये जपानच्या किनाऱ्यावर भयानक त्सुनामी आली होती, ज्यामध्ये सुमारे 20,000 लोक मृत्युमुखी पडले होते.
त्सुनामीनंतर समुद्रात उसळणाऱ्या लाटा रोखण्यासाठी जपानने ही महाकाय भिंत उभारली आहे.
या भिंतीचा पाया अनेक ठिकाणी 25 मीटर खोल आहे. जेणेकरून ही भिंत मजबूत बनवते.
ही भिंत उंच वादळे आणि लाटांचा तडाखा सहन करु शकते.
काही भागात, या भिंती 14.7 मीटर उंच आहेत आणि पूर्वीच्या भिंतींपेक्षा खूपच उंच आहेत. यासोबतच उंच झाडे देखील लावण्यात आली आहेत.
सुमारे 400 किलोमीटर लांबीच्या या समुद्राच्या भिंती, ईशान्य जपानच्या किनारपट्टीवर बांधण्यात आल्या.
सरकारने नवीन आणि दुरुस्तीच्या समुद्र भिंतींच्या बांधकामासाठी सुमारे १२ अब्ज डॉलर्सची तरतूद केली आहे.