डिजिटल मार्केटींग, एआय आणि ऑटोमेटेड कॉलिंग प्रक्रियांमुळे सध्या प्रत्यक्षात टेलीमार्केटींग करणाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आहेत.
मशिन लर्निंग टेक्नोलॉजी आणि ऑटेमेटेड प्रक्रियांमुळं डेटा एन्ट्री करणाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
सेल्फ चेकआऊट आणि ऑटोमेटेड पेमेंट अशा पद्धतींचा अवलंब वाढल्यामुळं रिटेल कॅशिअर पदावरील नोकऱ्याही पुढच्या 10 वर्षांत नामशेष होऊ शकतात.
एटीएम, ऑनलाईन पेमेंट, ऑनलाईन बँकिंग या आणि अशा अनेक सुविधांमुळं प्रत्यक्षात बँकेतून खातेधारकांची मदत करणाऱ्यांची नोकरीही येत्या काळात धोक्यात येऊ शकते.
स्वयंचलिक वाहनं आणि कार राईड शेअरिंगच्या वाढत्या प्रमाणामुळं टॅक्सी चालक आणि वाहन चालकांची नोकरी धोक्यात येऊ शकते.
यंत्रमानवाचा वापर आणि तंत्रज्ञानाच्या बळावर अनेक लहानमोठी कामं पूर्ण होत असल्यामुळं कापड क्षेत्रात काम करणाऱ्यांच्याही नोकऱ्या धोक्यात आहेत.