इथं साधा 1 रुपयाही Income Tax घेत नाही! 'या' 7 देशांना म्हणतात जगातील Tax Heavens; पाहा संपूर्ण यादी

चर्चा आयकर परतावा आणि 31 जुलैची

सध्या भारतामध्ये सर्वसामान्यांपासून कंपन्यांपर्यंत चर्चा आहे ती आयकर परताव्याची. आयकर परतावा भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै ही आहे.

कर न आकारणारे देश

मात्र भारताप्रमाणेच सर्वच देशांमध्ये वैयक्तिक अर्थार्जनावर कर आकारला जात नाही. या अशा देशांना टॅक्स हेवन म्हणजे करमुक्त उत्पन्न असणारे म्हणतात. असे देश कोणते ते पाहूयात...

युएई

दुबईबरोबरच संयुक्त अरब अमिरातीसुद्धा करमुक्त उत्पन्नाला समर्थन करणार करणारा देश असून इथेही सर्वसामान्यांना टॅक्स भरावा लागत नाही.

डॉमनिका

डॉमनिकामधील सर्व उत्पन्न हे करमुक्त असून त्यामुळेच इथे परदेशातूनही अधिक जण गुंतवणूक करतात. परदेशी नागरिकांच्या माहितीची गुप्तता राखली जाण्याची हमी इथे दिली जाते.

कतार

आखाती देशांमधील कतारमध्ये वैयक्तिक तसेच कॉर्परेट टॅक्स आकारला जात नाही. त्यामुळे इथे जगभरातून भरपूर प्रमाणेत गुंतवणूक होते.

बर्म्युडा

या छोट्याश्या देशामध्येही थेट कर अजिबात आकारला जात नाही.

पनामा

मध्य अमेरिकेमधील सर्वात मोठा टॅक्स हेवन म्हणून ओळखा जाणारा देश म्हणजे पनामा. इथे कोणत्याही प्रकारचा कर आकारला जात नाही.

बहामा

वेस्ट इंडिज समुहामधील बहामा हा देशही करमुक्त देशांपैकी एक आहे. इथं कोणताही कर आकारला जात नाही.

सर्वोत्तम टॅक्स फ्री देश

केमॅन बेटं - हा कॅरेबियन समुद्रामधील एक बेटवजा देश असून इथे कोणताही कर आकारला जात नसल्याने हा जगातील सर्वोत्तम टॅक्स फ्री देश मानला जातो. कर वाचवण्यासाठी इथे मोठ्याप्रमाणात कंपन्या सबसिडरी कंपन्या सुरु करतात.

VIEW ALL

Read Next Story