'माझी बायको 12 वर्षांच्या मुलीसारखी दिसते'

सोशल मीडियावर सध्या काही फोटो व्हायरल होत आहेत. यातील जोडप्याला ट्रोलिंगला सामोरे जावे लागत आहे. कारण या व्यक्तीची पत्नी 12 वर्षांच्या मुलीसारखी दिसते.

Mansi kshirsagar
Nov 13,2023


लिंडसे एशटन असं या महिलेचे नाव असून ती आता 22 वर्षांची आहे. मात्र, ती 12 वर्षांची असल्यासारखीच दिसते. यामागे एक कारण आहे.


लिंडसेची उंची 4 फूट 10 इंच इतकी आहे. तिचा आवाजही लहान मुलांसारखा आहे. त्यामुळं लोकांना असं वाटतं की तिचा पतीही तिला मुलांसारखंच वागणूक देतो.


मात्र, असं अजिबात नाहीये. लिंडसेचे वैवाहिक आयुष्य खूप चांगलं आहे. त्यांना दोन मुलंदेखील आहेत.


लिंडसे म्हणते की, लोकांना असं वाटतं की आम्ही खुश नाहीयेत. मात्र असं काहीच नाहीये आम्ही एकमेकांसोबत खूप आनंदी आहोत.


लिंडसेचा पती म्हणतो की, मी तिला बाहेर न्यायला घाबरतो कारण लोकं बोलतात की माझी बायको 12 वर्षांची मुलगी दिसते.


खरं तर लिंडसे १२ वर्षांची असताना तीला दुर्धर कॅन्सर झाला होता त्यामुळं तिची वाढ खुंटली. ती आता पूर्णपणे बरी झाली असली तरी तिची वाढ मात्र झाली नाही.

VIEW ALL

Read Next Story