खरं तर रंग हे आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहेत. प्रत्येक संस्कृतीमध्ये वेगवेगळ्या रंगांना वेगवेगळं महत्त्व आहे.
त्यामुळे रंगांसंदर्भातील निर्बंधही केवळ कपडे अथवा ध्वजांवरच नाही तर इतरही काही गोष्टींवर आहे. यामध्ये लिखाणाचाही समावेश आहे.
याच उत्तम उदाहरण द्यायचं झालं तर चीनसहीत काही देशांमध्ये पेनाची शाई कोणती आहे यालाही विशेष महत्त्व आहे.
चीन आणि कोरियामधील लोक लाल रंगाची शाई असलेलं पेन कोणाचीही नावं लिहिण्यासाठी वापरत नाहीत.
लाल पेनाने एखाद्याचं नाव लिहिणं हे अशुभ किंवा एखाद्यावर ठपका ठेवण्यासारखं असल्याचं या देशांमध्ये मानलं जातं.
लाल पेनाने नाव लिहिणं हे वाईट नशीब किंवा मृत्यूच्या बातमीशी संलग्न करुन पाहिलं जाण्याची मान्यता या देशांमध्ये आहे.
या देशांमध्ये पूर्वी लाल रंगाच्या शाईचे पेन मृतांचे आकडे लिहिण्यासाठी वापरले जायचे.
त्यामुळेच आता लाल रंगाच्या पेनाने कोणीचीही नावं या देशांमध्ये लिहिली जात नाहीत.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)