नेपाळचं नाही तर 'या' देशात सुद्धा सोशल मीडियावर आहे बॅन

Published by: Pooja Pawar | Sep 08, 2025

नेपाळमध्ये सोशल मीडिया ऍप्सवरील बंदीवरून मोठा गदारोळ सुरु आहे. तेथील सरकारने २६ सोशल मीडिया ऍप्सवर बंदी घातल्याने या निर्णयाच्या निषेधार्थ अनेक तरुण रस्त्यावर उतरून निदर्शनं करतायत.

Published by: Pooja Pawar | Sep 08, 2025

परंतू तुम्हाला माहितीये का केवळ नेपाळच नाही तर अनेक देशांमध्ये सुद्धा सोशल मीडियाच्या वापरावर बंदी आहे.

Published by: Pooja Pawar | Sep 08, 2025

उत्तर कोरिया :

उत्तर कोरियामध्ये, सामान्य लोकांसाठी सोशल मीडिया आणि इंटरनेटची सुविधा न च्या बरोबर आहे. येथे फक्त सरकारी अधिकाऱ्यांना मर्यादित इंटरनेट सुविधा दिली जाते. त्यामुळे येथे सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणं अशक्य आहे. कारण असं केल्यास मृत्युदंडाची शिक्षा दिली जाते.

Published by: Pooja Pawar | Sep 08, 2025

इराण : इराणमध्ये फेसबुक, एक्स आणि यूट्यूब सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही बंदी आहे. इराण सरकारने राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली ही बंदी घातली आहे. सोशल मीडियावर अश्लील मजकूर पोस्ट केल्यास कठोर शिक्षेची तरतूद आहे, ज्यामुळे तुरुंगवास किंवा मृत्युदंड देखील होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Sep 08, 2025

सौदी अरेबिया : सौदी अरेबियामध्ये सोशल मीडियावर सरकार निरीक्षण ठेवते. सरकारविरोधी किंवा धार्मिक भावना दुखावणाऱ्या कोणत्याही पोस्टमुळे तुरुंगवास, दंड किंवा मृत्युदंड देखील होऊ शकतो.

Published by: Pooja Pawar | Sep 08, 2025

चीन : चीनमध्ये सोशल मीडियाबाबत कडक निर्बंध आहेत, फेसबुक, इंस्टाग्राम, यूट्यूब आणि एक्स सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर येथे पूर्णपणे बंदी आहे. हेच कारण आहे की चीनमध्ये घडणाऱ्या गोष्टी जगासमोर सहज येत नाहीत.

Published by: Pooja Pawar | Sep 08, 2025

अफगाणिस्तान : अफगाणिस्तानातील तालिबान सरकारने सोशल मीडियावर बंदी घातली आहे. येथे कोणत्याही सजीव वस्तूचे फोटो काढून ते शेअर केल्यास तालिबानकडून शिक्षा दिली जाते.

Published by: Pooja Pawar | Sep 08, 2025

VIEW ALL

Read Next Story