'या' देशातील रस्त्यांवर फक्त पांढऱ्या रंगाच्या गाड्यांनाच परवानगी

Pooja Pawar
Dec 01,2025


भारतात तुम्हाला विविध रंगाच्या गाड्या रस्त्यांवरून धावताना दिसतात. पण जगातील असा एक देश आहे तिथे पांढऱ्या रंगाच्या गाड्यांनाच परवानगी असते.


तुर्कमेनिस्तानची राजधानी अश्गाबात इथे असा विचित्र नियम आहे.


अश्गाबात या संपूर्ण शहरातील वास्तू या पांढऱ्या संगमरवरी दगडाने बनलेल्या आहेत.


जगभरात हे शहर व्हाइट मार्बल सिटी म्हणून प्रसिद्ध आहे. या शहराला पांढऱ्या रंगाचं इतकं वेड आहे की त्यांनी याबाबत काही अजब नियम बनवलेत.


हे शहर केवळ पाहण्यासच प्रेक्षणीय नाही तर जगातील सर्वात जास्त पांढऱ्या संगमरवराचा वापर केल्याबद्दल गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने अधिकृतपणे नोंद केली आहे.


2000 नंतर, मोठ्या प्रमाणात पुनर्विकास करण्यात आला आणि 550 हून अधिक संगमरवरी इमारती बांधण्यात आल्या आहेत.


फक्त पांढऱ्या गाड्यांना परवानगी देण्याचा नियम 2018 मध्ये तत्कालीन राष्ट्रपती गुरबांगुली बर्दीमुखमेदोव्ह यांनी लागू केला होता.


राष्ट्रपती गुरबांगुली बर्दीमुखमेदोव्हला पांढरा रंग खूप आवडायचा. तो पेशाने डेंटिस्ट सुद्धा होता.


पांढऱ्या रंगाव्यतिरिक्त इतर कोणत्याही रंगाची वाहने रस्त्यावर धावताना दिसल्यास पोलिस ताबडतोब जप्त करून घेतात. मालकांकडून सुद्धा मोठा दंड आकारला जातो आणि त्यांची वाहने पुन्हा रंगवल्याशिवाय किंवा कायदेशीर आवश्यकतांचे पालन करेपर्यंत जप्त केली जातात.

VIEW ALL

Read Next Story