फक्त बर्फाच्छादित भागांमध्येच दिसतात 'हे' दुर्मिळ प्राणी- पक्षी

Jan 06,2025

आर्क्टिक हेर

आर्क्टिक हेर हा एक बर्फाच्छादित प्रदेशात आढळणारा पक्षी असून, त्यांची केसाळ त्वचा बोचऱ्या थंडीपासून त्यांचं रक्षण करते.

बेलुगा व्हेल

समुद्रातील कॅनरी अशी ओळख असणारे बेलुगा व्हेल मासे बर्फाळ पाण्यात सहज पोहतात.

मस्क ऑक्स

याकसारखाच दिसणारा हा प्राणी त्याच्या केसाळ त्वचेमुळं अतिथंड प्रदेशात सहज तग धरतो.

आर्क्टिक कोल्हे

कोल्ह्यांच्या प्रजातीमधील हा एक लहान प्रकार. पांढरी केसाळ आणि चमकदार त्वचा हे या प्राण्याचं वैशिष्ट्य.

अटलांटिक पफिन

नारंगी चोच हे या पक्ष्याचं मुख्य आकर्षण.

हार्प सील

पांढऱ्या त्वचेच्या अच्छादनासह या प्राण्याचा जन्म होतो. हे प्राणी उत्तमरित्या पोहतातसुद्धा

हिम घुबड

बर्फाळ प्रदेशात आढळणारं हे घुबड त्याच्या काळ्या पिवळ्या डोळ्यांसह आकर्षक पांढऱ्या पंखांमुळं लक्ष वेधतं.

VIEW ALL

Read Next Story