माऊंट एव्हरेस्ट हे जगातील सर्वोच्च पर्वतशिखर असून तो सर करणं हे प्रत्येक गिर्यारोहकाचं स्वप्न असतं.
माऊंट एव्हरेस्टची खास बाब म्हणजे या पर्वताची उंची दरवर्षी वाढत आहे. दरवर्षी या पर्वताची उंची वाढण्यामागचं नेमकं कारण जाणून घ्या.
माऊंट एव्हरेस्टची सध्याची उंची ही जवळपास 8849 मी. इतकी आहे. परंतु, 2005 जेव्हा या पर्वताची उंची मोजली गेली होती, तेव्हा ती 8844 असल्याचं सांगितलं गेलं.
खरंतर, पूर्व भारतीय आणि युरेशियन टेक्टोनिक चकत्यांची टक्कर ही हिमालय पर्वरांगेच्या निर्मितीला कारणीभूत आहे.
लंडनमधील युनिवर्सिटी कॉलेजच्या रिपोर्टनुसार, माऊंट एव्हरेस्टची उंची वाढण्यामागचं मुख्य कारण अरुण नदी आहे.
अरुण नदी ही हिमालयाच्या खालील भागातून वाहत येते आणि वाहताना ती सोबत दलदलीचा भाग घेऊन पुढे वाहत जाते.
यामुळे पर्वताची उंची कमी होऊ लागते आणि माऊंट एव्हरेस्टची वरच्या टोकाचा भाग हा वाढत जातो. याच कारणामुळे हिमालयाच्या उंचीमध्ये वाढ होताना दिसते.