भारतातील 'या' लज्जतदार पदार्थांना परदेशात बंदी; पाहून म्हणाल त्यांचा काय दोष... . भारतीय संस्कृतीशी असणारे धागेदोरे पाहता सोमालियामध्ये समोसा खाण्यास बंदी आहे.
2005 पासून लिड आणि मर्क्यूरीचं प्रमाण जास्त असल्याचं कारण देत कॅनडामध्ये च्यावनप्राशवर बंदी घालण्यात आलं.
भारतात दर दुसऱ्या पदार्थासोबत केचप दिसतं. पण, फ्रान्समध्ये मात्र त्याच्यावर बंदी आहे. तरुण मुलांमध्ये याच्या सेवनाचं वाढतं प्रमाण पाहता हा निर्णय घेण्यात आला आहे.
1992 पासून सिंगापूरमध्ये चुइंग गमवर बंदी घालण्यात आली आहे.
शहराची परंपरा टिकवून ठेवण्यासाठी वेनिस शहरात त्यांच्यावर बंदी आहे.
भारतीय खाद्यपदार्थ आणि मसाल्यांमध्ये वापरल्या जाणाऱ्या खसखसवर तैवान आणि सिंगापूरमध्ये बंदी आहे.
लहान मुलांमध्ये प्रसिद्ध असणाऱ्या जेली कपवर ऑस्ट्रेलियामध्ये बंदी आहे. मृतांचं प्रमाण पाहता हा निर्णय घेण्यात आला.