ग्रहांची जेव्हाजेव्हा चर्चा होते तेव्हा त्यांचे आकार, त्यांची वैशिष्ट्य यांचीही चर्चा होते.
ऑस्ट्रेलियाच्या युनिवर्सिटी ऑफ सदन क्वीन्सलँजडनं यासंदर्भातील माहिती दिली असून, रहस्याचा उलगडा केला आहे.
निरीक्षणकर्त्यांच्या माहितीनुसार या ग्रहांच्या वर्तुळाकारामागे गुरुत्त्वाकर्षणाची महत्त्वाची भूमिका आहे. ग्रह जितका मोठा, गुरुत्वाकर्षण तितकं जास्त असं सोपं समीकरण.
गुरुत्वाकर्षण विविध कणांना केंद्राच्या दिशेनं आकर्षित करते. सूर्याचं उदाहरण घेतलं तर, तो एक प्रखर तारा असला तरीही त्यात हेलियम आणि हायड्रोजन असल्यानं त्याला वर्तुळाकार मिळणं सोपं होतं.
गुरुत्वाकर्षणासोबतच घर्षणही यात महत्त्वाची भूमिका बजावतं. एखाद्या पिंडाचं द्रव्यमान बदललं तर तो एकाच जागी फिरू लागतो आणि यामुळं वर्तुळाकाराची निश्चिती होते.
ग्रह आणि त्यांच्या आकारांसंदर्भात आजवर अनेक सिद्धांत मांडण्यात आले आहेत.
महत्त्वाची बाब अशी की, पृथ्वीसुद्धा याच ग्रहमालेचा भाग असून, आता यासंदर्भात पुढे काय निरीक्षण होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.