आई होणं यापेक्षा मोठं सुख कुठलंच नाही. प्रत्येक महिलेचे आई होण्याचा अनुभव वेगवेगळा असला तरी आई होणं म्हणजे जगातील सर्वात मोठं गिफ्ट असतं.
पण काही शारीरिक समस्यामुळे अनेक महिला या सुखापासून वंचित राहतात. पण आज आम्ही तुम्हाला अशा महिलेबद्दल सांगणार आहोत. जिने एक नाही दोन नाही तर तब्बल 69 मुलांना जन्म दिलाय.
एवढंच नाही तर तिने आपल्या नावावर सर्वाधिक मुलं जन्माला घालण्याचा रेकॉर्ड नोंदवला आहे.
या महिलेने 27 वेळा गर्भवती होण्याचा आनंद आणि वेदना सहन केल्या आहेत.
27 गरोगरपणात या महिलेने एकूण 69 मुलांना जन्म दिला, ज्यातील 67 मुलं निरोगी आयुष्य जगत आहेत.
या महिलेचे नाव वॅलेंटिना असून तिच्या पतीचे नाव फिओडर वॅसीलयेव आहे. हे एक रशियन जोडपं आहे.
वॅलेंटिना ही वर्ष 1725 ते 1765 च्या दरम्यान 27 वेळा गरोदर राहिली.
27 गरोदरपणात तिला 16 वेळा जुळी मुलं झाली, 7 वेळा तिने एकत्र तीन मुलांना जन्म तर 4 वेळा एकत्र चार मुलांना जन्म दिला.
आश्चर्याची बाब म्हणजे, फिओडर मात्र एकूण 87 मुलांचे वडील होता, कारण त्याला दुसऱ्या पत्नीपासून 18 मुलं झाली होती.