दारू ही जगातील एक असं पेय आहे ज्याची किंमत ही 100 रुपयांपासून कोट्यवधी रुपयांपर्यंत जाते.
तेव्हा आज जगातील सर्वात महागड्या दारू विषयी जाणून घेऊयात, जिची चवं घेणं कदाचित अनेक मद्यपींचं स्वप्न असू शकतं.
जगातील सर्वात महागड्या दारूचं नाव इसाबेला इस्ले (Isabella Islay) असं आहे. याच्या एका बॉटलची किंमत ही जवळपास 6.2 मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास 52 कोटी रुपये आहे.
एवढ्या किंमतीत तुम्ही भारतातील अनेक शहरांमध्ये 50 लाख रुपये किंमतीचे 100 फ्लॅट खरेदी करू शकता.
या दारूचं वैशिष्टय असं की ज्या बाटलीत ही वाइन ठेवली आहे ती पांढऱ्या सोन्याची बनलेली आहे. ती एका कंटेनरसारखी दिसते आणि त्यावर जवळपास 8500 हिरे आणि 300 माणिक जडवलेले आहेत.
ही दारू म्हणजे सिंगल स्कॉच माल्ट व्हिस्की असून 2011 मध्ये लाँच करण्यात आली होती. ही एक स्पेशल एडिशन व्हिस्की आहे.
इसाबेला इस्ले व्यतिरिक्त, अशा अनेक वाइन आहेत ज्यांच्या बॉटल लाखो आणि अगदी कोट्यवधी रुपयांच्या किंमतीत विकल्या जातात.
(इथं दिलेली माहिती तज्ज्ञांशी केलेल्या चर्चेवर आधारित आहे. ही एक सामान्य माहिती आहे. कोणताही व्यक्तीगत सल्ला नाही. संबंधित माहितीसाठी ZEE 24 Taas जबाबदार नसेल.)