जगभरात अनेक असे पक्षी आहेत, ज्यांना पंख आहेत मात्र ते उडू शकत नाहीत.
ज्यामध्ये शहामृग हा जगातील सर्वात मोठा पक्षी मानला जातो. याचे पंख लहान असल्यामुळे तो उडू शकत नाही.
अंटार्कटिका बेटावर पेंग्विन पक्षी आढळतात. त्यांचे पंख देखील खूप लहान असल्यामुळे ते उडू शकत नाहीत.
इमू हा एक ऑस्ट्रेलियन पक्षी आहे. जो शहामृगानंतर दुसरा पक्षी मानला जातो. याचे शरीर जड आणि पंख लहान असल्यामुळे उडू शकत नाही.
काकापो हा न्यूझीलंडमध्ये आढळणारा पोपटासारखा दिसणारा पक्षी आहे. तो देखील लहान पंखांमुळे उडू शकत नाही.
न्यूझीलंडच्या दक्षिण बेटावर आढळणारा ताकाह पक्षी देखील उडू शकत नाही.