48 वर्षांपासून अंतराळात वाजत आहे 'हे' गाणे!

Tejashree Gaikwad
Mar 03,2025


1977 मध्ये व्हॉयेजर-1 आणि व्हॉयेजर-2 अवकाशात पाठवण्यात आले होते.


व्हॉयेजर-1 मध्ये 12 इंची सोन्याचा मुलामा असलेली तांब्याची डिस्क बसवण्यात आली होती.


या डिस्कमध्ये वेगवेगळ्या भाषा, आवाज आणि गाणी रेकॉर्ड केली गेली होती.


बीथोव्हेन, बाख, मोझार्ट यांसारख्या महान संगीतकारांसोबत भारतीय कलाकारांचेही गाणी त्यात समाविष्ट करण्यात आलं होतं.


भारतीय शास्त्रीय गायिका केसरबाई केरकर यांचे 'जाति कहाँ हो... 'हे गाणे त्यात होते.


सुप्रसिद्ध केसरबाई केरकर या गायिका जयपूर घराण्याच्या होत्या.


हे गाणे आजही अवकाशात गुंजत असल्याचे बोलले जाते.


केसरबाईंना रवींद्रनाथ टागोरांनी 'राग की रानी' म्हणून गौरवले होते.


पृथ्वीवरील संगीत आणि संस्कृतीचा संदेश देण्यासाठी ही डिस्क पाठवण्यात आली होती.

VIEW ALL

Read Next Story